कृष्ण जन्माष्टमीला निर्माण होतायत 'हे' शुभ योग!
By
Harshada Bhirvandekar
Aug 14, 2024
Hindustan Times
Marathi
दरवर्षी भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
यंदा भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी २६ ऑगस्टला पहाटे ३.३९ वाजता सुरू होऊन, २७ ऑगस्टला दुपारी २.१९ वाजता संपेल.
या दरम्यान सोमवार, २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे.
या दिवशी दिवसभर उपवास करून आणि रात्री १२ वाजता प्रसाद घेऊन भाविक जन्मोत्सव साजरा करतात.
जन्माष्टमीच्या निमित्ताने देवाचे बालस्वरुप लड्डू गोपाळ यांना सजवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते.
यावर्षी जन्माष्टमीला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत.
ज्योतिष अभ्यासकांच्या मते, द्वापार युगात श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी होते, तसेच या वर्षी जन्माष्टमीला असेच योग तयार होत आहेत.
भाद्रपद अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला, असे मानले जाते.
यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही निर्माण होणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त १२.०१ ते १२.४५ पर्यंत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा