‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची गर्लफ्रेंड आहे ‘ही’ अभिनेत्री!

By Harshada Bhirvandekar
Nov 29, 2024

Hindustan Times
Marathi

‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडने नुकतीच सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्याने रिलेशनशिप मध्ये असल्याची थेट कबुली या पोस्टद्वारे दिली आहे. 

इतकंच नव्हे तर होणाऱ्या बायकोचा फोटोही त्याने शेअर केला आहे.

किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसह रिलेशनमध्ये असल्याचं समोर आलं आहे.

वैष्णवीबरोबरचा थेट फोटो किरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस २’ मध्ये एकत्र काम केले होते. 

वैष्णवी देखील मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा असून तिने ‘देवमाणूस २’, ‘तू चाल पुढं’, ‘टिकली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे.

शिवाय ती ‘बांबू’ या चित्रपटातही झळकली. तर ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे किरण गायकवाडला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

याशिवाय किरणने चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

'आई कुठे काय करते'मधील आरोहीचे केळवण