अमिताभ-प्रभासपेक्षा श्रीमंत आहे ‘कल्की’मधील ‘हा’ अभिनेता!

By Harshada Bhirvandekar
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

जबरदस्त व्हीएफएक्स आणि स्टारकास्टने सजलेला 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन यासारखे सुपरस्टार्स आहेत. पण या चित्रपटात आणखी एक स्टार आहे.

'कल्की' चित्रपटातील हा अभिनेता अमिताभ आणि प्रभास यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आणि श्रीमंत आहे.

या चित्रपटात त्यांनी जामीनदाराची भूमिका साकारली आहे. हा अभिनेता आहे साऊथ स्टार ब्रह्मानंद.

ब्रह्मानंद यांनी आतापर्यंत १०००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  त्यांचे नाव गिनीज बुकातही नोंदवण्यात आले आहे.

अभिनेते ब्रह्मानंद एका चित्रपटासाठी १ ते २ कोटी रुपये घेतात. त्यांचे नेटवर्थ ५०० कोटींचे आहे.

ब्रह्मानंद यांच्याकडे मुंबईपासून ते हैद्राबादपर्यंत अनेक घरे आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्या देखील आहेत.

ब्रह्मानंद यांना २००९मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा अभिनय सगळ्यांनाच खूप आवडतो.

'कल्की' चित्रपटात त्यांनी भैरवची म्हणजे प्रभासच्या जामीनदाराची भूमिका साकारली आहे.

'कल्की २८९८ एडी'मधील भूमिकेसाठी देखील ब्रह्मानंद यांनी भरपूर फी घेतल्याचे बोलले जात आहे.

बीटापासून बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ!

Image Credits: Adobe Stock