या राशीच्या लोकांनी घालू नये कासवाची अंगठी
By
Priyanka Chetan Mali
Dec 16, 2024
Hindustan Times
Marathi
वास्तुशास्त्र आणि फेंगशुई नुसार कासवाला सुख-समृध्दि चे प्रतीक मानले जाते.
अनेकजण घरी लाकडी किंवा धातुचा कासव ठेवतात,तर काहीजण कासवाची अंगठी घालतात.
अशी मान्यता आहे कि कासवाची अंगठी घातल्याने जीवनामध्ये सुख-समृध्दि आणि सौभाग्याची वाढ होते.परंतु हीच अंगठी काहीजणांसाठी दुर्भाग्याचे कारण बनू शकते.
जाणून घेऊया कासवाची अंगठी कोणत्या राशीच्या लोकांनी घालू नये.
मेष,वृश्चिक,मीन आणि कन्या राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी घालू नये.
असे मानले जाते की जर या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घातली तर त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
या राशीच्या लोकांनी सल्ल्याशिवाय अंगठी घातल्याने व्यापारात नुकसान सहन करावे लागू शकते.
कासवाच्या अंगठीमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि भांडणे होऊ शकतात.
या चार राशीचे लोक कासवाची अंगठी घालण्याऐवजी धातूचे किंवा लाकडी कासव घरात ठेवू शकतात.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा