उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्यास मदत करतात या गोष्टी

Pexels

By Hiral Shriram Gawande
Mar 27, 2024

Hindustan Times
Marathi

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या. हे तुमच्या शरीरात पाणी कमी होण्यापासून रोखेल.

Pexels

एक चांगली पाण्याची बॉटल विकत घ्या आणि जिथे जाल तिथे सोबत पाणी घेऊन जा.

Pexels

नियमितपणे पाणी पिण्याची खात्री करण्यासाठी रिमाइंडर किंवा अलार्म सेट करा. यासाठी काही अॅप्सही आहेत.

Pexels

फ्लेवर्ड पाणी करू शकता. यासाठी पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना, तुळस, जिरे, मेथी, सब्या टाकून ठेवू शकता. या पाण्याने शरीर हायड्रेट राहते.

Pexels

आहारात पाणीयुक्त पदार्थांचा समावेश करा. भाज्या आणि संत्री, काकडी, स्ट्रॉबेरी, टरबूज यासारखी अधिक पाणीयुक्त फळे खा. हे शरीर हायड्रेट ठेवण्यासोबत आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते.

Pexels

साखरयुक्त पेये, सोडा, कोल्ड ड्रिंक्स आणि न्युट्रिएंट्स डेन्स ड्रिंक्स पिण्याऐवजी पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होईल. कॅलरीज कमी करण्यास आणि शरीरातील हायड्रेशन वाढविण्यात मदत होईल.

Pexels

Enter text Here

Pexels

जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्याची खात्री करा. हे पोट भरल्याची भावना देते. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते, पचनशक्ती वाढवते आणि शरीर पोषक द्रव्ये शोषून घेते.

Pexels

स्मार्टफोनवरील ॲप्स वापरून तुमच्या दैनंदिन पाण्याच्या सेवनाचा ट्रॅक ठेवा किंवा हायड्रेशन लॉग ठेवून तुमच्या पाण्याच्या सेवनाचा ट्रॅकिंग ठेवा.

Pexels

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?