निरोगी वैवाहिक जीवनात कपलने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. जेव्हा कपलला नात्यात सुरक्षित वाटते तेव्हा ते आनंदी होऊ शकतात.
चांगले श्रोते व्हा. धीर धरा आणि तुमच्या जोडीदाराचे ऐका. तसेच त्याला योग्य प्रतिसाद द्या.
पार्टनर कंफर्टेबल आहे याची खात्री करा. त्यांना कम्फर्ट झोनमध्ये असल्याची जाणीव होऊ द्या.
भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील असे वातावरण तयार करा. कोणत्याही गोष्टीबद्दल लाजाळू किंवा संकोच होणार नाही याची काळजी घ्या.
संकटाच्या वेळी तुमच्या जोडीदाराचे सांत्वन करा. मी तुझ्यासोबत आहे असे म्हणा.
जेव्हा तुमच्या पार्टनरला तुमची गरज असते तेव्हा त्यांच्यासाठी हजर रहा. त्यांच्यासाठी वेळ काढा. तुमची उपस्थिती ही जोडीदाराला हवी असलेली सर्वात महागडी भेट असते.
तुमच्या जोडीदाराच्या निवडी आणि निर्णयांचा आदर करा. त्यांच्या वैयक्तिक हिताचे समर्थन करा.
तुमच्या पार्टनरला ज्या गोष्टींची भीती वाटते त्यापासून दूर राहा.