विमानात ‘या’ गोष्टी आहेत बॅन; घेऊन जाल तर पकडतील पोलीस!

By Harshada Bhirvandekar
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

फ्लाईट म्हणजेच विमान हे वाहतुकीचे सर्वात जलद साधन आहे. विमानाच्या मदतीने आपण कमी वेळात लांबचा प्रवास करू शकतो.  

विमानाने प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. अशा काही गोष्टी आहेत ज्यांना विमानात नेण्यास सक्त मनाई आहे.  

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही विमानात घेऊन जाऊ शकत नाही.

विमानात नारळ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. नारळ हा ज्वलनशील आहे आणि त्याला कधीही आग लागू शकते.

काही लोक प्रवासात स्वसंरक्षणासाठी पेपर स्प्रेसोबत घेऊन जातात. मात्र, विमान प्रवासादरम्यान पेपर स्प्रेसोबत ठेवता येणार नाही.  

तंबाखू, विडी, सिगारेट, लायटर यासह कोणतीही मादक पदार्थ विमानात नेता येत नाही. 

माचिस, लायटर, पेंट, थिनर यासारख्या गोष्टींमुळेही लगेच आग पकडू शकते. त्यामुळे विमानात तुम्ही या गोष्टीही सोबत नेऊ शकत नाही.  

विमानाने प्रवास करत असाल, तर बेसबॉल बॅट, हॉकी स्टिक, गोल्फ स्टिक, की पोल, धनुष्यबाण इत्यादी क्रीडा साहित्य देखील सोबत नेऊ शकत नाही.  

फ्लाईटमध्ये प्रवास करताना तुम्ही जर सोबत रेझर, ब्लेड, कात्री, नेलकटर, नेलफायलर यासारख्या वस्तू ठेवल्यात तर पोलीस तुम्हाला पकडू शकतात.  

याशिवाय विमानाने प्रवास करताना तुम्हाला तुमच्या सोबत मांस आणि भाजीपाला नेण्यासही सक्त मनाई आहे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान