प्रदोष व्रताच्या दिवशी आवर्जून करावेत ‘हे’ खास उपाय!

By Harshada Bhirvandekar
Jun 18, 2024

Hindustan Times
Marathi

भगवान शिवाच्या भक्तांसाठी प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे.

ज्येष्ठ महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत १९ जून २०२४, बुधवारी आहे.

बुध प्रदोष व्रताच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात, असे मानले जाते की यामुळे जीवनातील समस्या दूर होतात.

प्रदोष व्रत असो, वा इतर दिवस शिवला जल अर्पण करावे. गंगाजल अर्पण केल्यास ते अधिक चांगले मानले जाते.

प्रदोष व्रतात संध्याकाळच्या पूजेनंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीला खीर अर्पण करा. 

या शिवाय पूजा करताना माता पार्वतीला शृंगाराचे सामान अर्पण करा.

जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर, महादेवाला पंचामृताने अभिषेक करा.

महादेवाला जलाभिषेक करताना लघु मृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप करा.

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?