बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केलंय पाकिस्तानी चित्रपटात काम!

By Harshada Bhirvandekar
Jul 04, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री शबाना आझमी यांनी अनेक भारतीय चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांनी ‘द डस्क’ या पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे.

श्वेता तिवारी भारतात प्रसिद्ध आहे. श्वेताने पाकिस्तानी चित्रपट 'सल्तनत'मध्ये काम केले आहे.

अभिनेत्री नेहा धुपिया हिने 'कभी प्यार ना करना' या चित्रपटातून पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे.

अभिनेते ओम पुरी यांनी 'ऍक्टर इन लॉ' या पाकिस्तानी चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'खुदा के लिये', 'जिंदा', 'भाग' अशा अनेक पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे.

अमृता अरोरा हिने पाकिस्तानी चित्रपट 'गॉडफादर: द लिजेंड कंटिन्यू'मध्ये काम केले होते.

विनोद खन्ना यांनी पाकिस्तानी चित्रपट 'गॉडफादर: द लिजेंड कंटिन्यू'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

बॉलिवूडचे कॉमेडियन जॉनी लिवर यांनी पाकिस्तानी चित्रपट 'लव में गम' या चित्रपटात काम केले होते.

अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांनी पाकिस्तानी चित्रपट 'विरसा'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान