योगिनी एकादशीच्या दिवशी तयार होतायत ‘हे’ शुभ योग!

By Harshada Bhirvandekar
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात दरवर्षी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला योगिनी एकादशीचे व्रत केले जाते.

यावर्षी योगिनी एकादशीचे व्रत मंगळवार, २ जुलै रोजी पाळण्यात येणार आहे.

यावेळी योगिनी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे एकादशीचे महत्त्व वाढले आहे.

या एकादशीला धृती योग, त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग, शिवास योग तयार होत आहेत.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर पिवळे कपडे परिधान करावेत. मग, भगवान विष्णूचे ध्यान करावे.

या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला धूप, दिवा, पिवळी फळे, पिवळी फुले, मिठाई, सुपारी आणि तुळशीची पाने अर्पण करा.

पूजा करताना योगिनी एकादशीची व्रतकथा वाचा आणि आरती करा. यानंतर नैवेद्य अर्पण करा. 

गवार खाण्याचे फायदे