गुरुवारच्या दिवशी आवर्जून दान कराव्यात ‘या’ गोष्टी!

By Harshada Bhirvandekar
Jun 13, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंचा आणि देवगुरु बृहस्पती यांचा दिवस मानला जातो.  

गुरुवारी दान करण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषी ज्यांच्या कुंडलीत गुरु कमजोर आहे, त्यांना या दिवशी दान करण्याचा सल्ला देतात.  

ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी कोणत्या सात वस्तूंचे दान केले जाऊ शकते, याबद्दल जाणून घेऊया...  

गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि त्यांना केळी अर्पण करा. मग ती केळी गरिबांमध्ये वाटून टाका. इतर कोणतेही पिवळे फळ देखील दान करू शकता.  

गुरुवारच्या दिवशी तुम्ही गोरगरिबांना पिवळ्या रंगाची मिठाई दान करू शकता.  

गरजू व्यक्तीला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे पुण्य मानले जाते.  

गुरुवारच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळे अन्न मग ते कच्च्या किंवा शिजवलेल्या स्वरूपात दान करू शकता. 

या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला हळद दान करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात.

गुरुवारच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला पितळेची किंवा तांब्याची भांडी दान करू शकता.  

या दिवशी तुम्ही तांदूळ आणि डाळ एखाद्या गरीबाला दान म्हणून द्या. जर तुमच्याकडे अन्न शिजवण्याचा वेळ असेल तर ते शिजवूनच वाढा.

आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी!