बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना मिळालीये जीवे मारण्याची धमकी!

By Harshada Bhirvandekar
Aug 11, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेते राजीव रॉय यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजीव यांना अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झालेला.

अंडरवर्ल्डमधील लोक दिग्दर्शक राकेश रोशन यांच्याही मागे लागले होते. त्यांना गोळी ही मारण्यात आली होती.

शाहरुख खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या धमक्या अनेकदा चित्रपटानंतर मिळतात.

गँगस्टर टोळ्यांनी अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्याच्या घराबाहेर गोळीबारही झालाय.

आमिर खानला 'सत्यमेव जयते'च्या शूटिंगदरम्यान आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

अभिनेत्री कंगना रनौतला तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

दीपिका पदुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटावरून बरेच वाद झाले होते. तेव्हा तिला जीवे मारण्याच्या धमक्या आले होते.

अभिनेता अक्षय कुमार याला २०१३मध्ये गँगस्टर रवी पुजारीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

अभिनेत्री सनी लिओनी ही पॉर्न स्टार होती. चित्रपट विश्वात आल्यानंतर तिला तिच्या पुर्वायुष्यामुळे धमक्या आल्या होत्या.

अभिनेत्री सोनम कपूर हिला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!