ट्रॅव्हिस हेडला या गोलंदाजांनी शुन्यावर बाद केले
By Rohit Bibhishan Jetnavare
Sep 09, 2024
Hindustan Times
Marathi
ऑस्ट्रेलियान फलंदाज ट्रॅव्हिस हेड टीम इंडियाला नेहमी नडतो. क्रिकेट विश्वात चाहते त्याला टीम इंडियाचा 'शत्रू' म्हणतात.
२०२३ च्या वनडे वर्ल्डकप फायनल, तसेच, WTC फायनल या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने भारताविरुद्ध शतक केले होते.
ट्रॅव्हिस हेडने नेहमीच भारताच्या विजयात अडथळा आणला आहे भारतीय चाहत्यांना नेहमीच दुखावले आहे.
दरम्यान, आपण येथे अशा १० गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी ट्रॅव्हिस हेडला 'शून्या'वर बाद केले आहे.
स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज ब्रॅडली करी याने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडला गोल्डन डकवर बाद केले होते.
ब्रॅडली करी
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीनेही ट्रेविड हेडला वनडेत शून्यावर बाद केले आहे.
तबरेझ शम्सी
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद केले आहे.
कागिसो रबाडा
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही ट्रॅव्हिस हेडला कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केले आहे.
स्टुअर्ट ब्रॉड
वेस्ट इंडिजचा गोलंदाज शामर जोसेफनेही ट्रेव्हिड हेडला कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केले आहे.
शामर जोसेफ
नवीन उल हक अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल यानेही ट्रेव्हिड हेडला शुन्यावर बाद केले आहे. नवीनने हेडला टी-20 आणि वनडेत शून्यावर बाद केले आहे.
नवीन उल हक
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोचनेही हेडला शुन्यावर बाद केले आहे. रोचने कसोटीत हेडला शून्यावर बाद केले होते.
केमार रोच
पाकिस्तानी गोलंदाज बिलाल आसिफने ट्रेविड हेडला शून्यावर बाद केले आहे. बिलालने कसोटीत हेडला शुन्यावर तंबूत पाठवले होते.
बिलाल आसिफ
ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानी गोलंदाज मीर हमझाचाही समावेश आहे. त्याने हेडला कसोटीत शून्यावर बाद केले.
मीर हमजा
पाकिस्तानची स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ट्रेव्हिड हेडला वनडेत शून्यावर बाद केले आहे.
शाहीन आफ्रिदी
कारले खाण्याचे फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा