अवघ्या १३व्या वर्षी पॉर्न साईटवर दिसले होते ‘या’ अभिनेत्रीचे फोटो!

By Harshada Bhirvandekar
May 19, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

जान्हवीचा हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. 

सध्या दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान तिने एक मोठा खुलासा केला आहे.

जान्हवी कपूरने करण जोहरशी बोलताना स्वतःबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला. 

तिने सांगितले की, जेव्हा ती १२-१३ वर्षांची होती, तेव्हा तिचे लैंगिक शोषण झाले होते.  

जान्हवी म्हणाली, जेव्हा मी माझ्या पालकांसोबत एका कार्यक्रमाला गेलो होते, तेव्हा पापाराझींनी चुकीच्या पद्धतीने माझे फोटो काढले होते.

यानंतर तिचे फोटो पॉर्न चित्रांवर उपस्थित होती. त्याचवेळी जान्हवीचे फोटो पाहून शाळकरी मुले तिची चेष्टा करायची.

जान्हवी पुढे म्हणाली, 'हे खूप विचित्र होतं आणि या परिस्थितीतून बाहेर पडणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.’

मी बऱ्याच काळापासून अशा नकारात्मक गोष्टी पाहिल्या आहेत. मी अजूनही अशा गोष्ट पाहत असल्याचे जान्हवी म्हणाली.

गरोदरपणात टाळा हे पदार्थ