AGNIVEERS : नौदलात दिमाखात दाखल झाली  अग्निवीरांची पहिली तुकडी 

Ninad Deshmukh

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 29, 2023

Hindustan Times
Marathi

भारतीय नौदलाचे एकूण २५८५ अग्निवीर मंगळवारी नौदलात दाखल झाले. यात २७२ मुलींचा समावेश 

Ninad Deshmukh

ओडिसा येथील आयएनएस चिल्का या नौदलाच्या तळावर एका दिमाखदार संचलन सोहळ्यात अग्निवीरची पहिली तुकडी नौदलात दाखल झाली. 

या दीक्षांत संचलन सोहळ्याला  नौदल प्रमुख अडमिरल आर हरी कुमार उपस्थित होते. 

Ninad Deshmukh

तब्बल १६  आठवड्यांच्या कठोर नौदल प्रशिक्षण या अग्निवीरांनी घेतले. यानंतर त्यांचा  नौदलातील प्रवास सुरू झाला आहे.  

नौदल प्रमुख म्हणाले, उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात. तसेच  राष्ट्र उभारणीसाठी  कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या मूलभूत मूल्यांचे पालन करावे. 

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदक व चषक प्रदान करण्यात आले.

Ninad Deshmukh

अमलाकांती जयराम, अग्निवीर (SSR), अजित पी, अग्निवीर (MR) यांना पुरुष गटात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अग्निवीर म्हणून सन्मानित करण्यात आले. 

Ninad Deshmukh

खुशी, अग्निवीर (एसएसआर) गुणवत्तेच्या एकूण क्रमानुसार सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर ठरली. तिला  दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या परितोषिकाने सन्मानित करण्यात आले. 

Ninad Deshmukh

अग्निवीर भरती अंतर्गत नौदलात पहिली तुकडी दाखल झाली आहे. 

Ninad Deshmukh

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. चार वर्षांसाठी काम सेवा करणाऱ्या या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटलं जाईल

Ninad Deshmukh

चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील २५  टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. 

Ninad Deshmukh

या योजनेत सामील होणाऱ्या तरुणांना मासिक पगारासह ( अग्निपथ योजना वेतन ) इतर फायदेही दिले जातील. अग्निवीरांना दिले जाणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.

Ninad Deshmukh

अग्निवीरला पहिल्या वर्षी सुमारे ४.७६ लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल. चौथ्या वर्षी सुमारे ६.९२ लाख रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच महिन्याला सुमारे 50 हजार रुपये पगार अग्निवीरचा असेल. 

Ninad Deshmukh

अग्निवीरला ४  वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर तिमाही निधी म्हणून ११  लाख रुपये दिले जातील, जे करमुक्त सेवा निधी पॅकेज असेल. 

Ninad Deshmukh

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram