‘कान्स’ गाजवणाऱ्या अभिनेत्रीला इंग्रजी बोलता येत नाही!

By Harshada Bhirvandekar
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

इंग्रजी भाषा बोलता न येणे आणि यामुळे न्यूनगंड येणे ही गोष्ट अनेक लोकांबरोबर होते.

अशीच गोष्ट मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीसोबत घडली आहे.

पण तरीही इंग्रजी भाषा बोलता न येण्याचा न्यूनगंड अजिबात न बाळगता या अभिनेत्रीने कान्स गाजवला आहे.

केवळ आपल्या अभिनयाच्या हिंमतीवर छाया कदमने हॉलिवूडमध्ये आपली मराठी पताका फडकावली आहे. 

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या छाया कदम नुकत्याच ‘कान्स’मधील गौरवामुळे चर्चेत आल्या.

यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तब्बल तीन दशकांनी भारतीय चित्रपटाला नामांकन मिळालं.

‘All We Imagine As Light’ या नामांकित चित्रपटात अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

या चित्रपटासाठी अभिनेत्री छाया कदम या कान्समध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी हा मंच गाजवला.

‘मला किती छान इंग्रजी बोलता येतं यासाठी तर, माझ्या कामासाठी आणि चित्रपटासाठी कान्समध्ये बोलावलं गेलं’, असं छाया कदम म्हणाल्या.

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels