'या' अभिनेत्रींचे सुंदर ब्रायडल लूक राहिले चर्चेत!

By Harshada Bhirvandekar
Dec 26, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनयातच नाही तर, फॅशनच्या बाबतीतही साऊथच्या अभिनेत्री नेहमीच वरचढ ठरताना दिसतात. पाहा त्यांचे लग्नातील खास लूक...

साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश हिचे लग्न नुकतेच पार पडले आहे. तिचा ब्रायडल लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कीर्तीने तिचा लूक अगदी पारंपरिक ठेवला होता. यात तिने भरजरी पारंपरिक दागिने घातलेले. 

अभिनेत्री शोभिता धुलिपाला ही देखील तिच्या लग्नातील लूकमुळे चर्चेत आहे. तिच्या रूपाचा राजेशाही थाट दिसला. 

शोभिताने तिच्या लग्नात जाड सोनेरी काठ असणारी पारंपरिक कांजीवरम साडी नेसली होती.

'लेडी सुपरस्टार' अभिनेत्री नयनतारा हिने तिच्या लग्नात सुंदर लाल साडी नेसली होती.

अभिनेत्री काजल अग्रवाल हिने लग्नासाठी खास भरजरी वर्क असलेला लेहंगा निवडला होता.

हंसिका मोटवानी हिने लग्नात लाल लेहंगा घातला होता, ज्यावर सोनेरी नक्षीकाम करण्यात आलं होतं.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!