‘बॉर्डर’ चित्रपटाला नकार दिल्याचा ‘या’ कलाकारांना झाला पश्चात्ताप!

By Harshada Bhirvandekar
Jun 03, 2024

Hindustan Times
Marathi

दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. कथेपासून ते चित्रपटाच्या गाण्यांपर्यंत लोक आजही याचे दिवाने आहेत.

‘बॉर्डर’ हा चित्रपट सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, सुदेश बेरी, कुलभूषण खरबंदा, जॅकी श्रॉफ, राखी अशा अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन बनवण्यात आला होता.  

‘बॉर्डर’ या चित्रपटाने कलाकारांचं नशीब उजळलं. मात्र, काही स्टार्सनी चित्रपट नाकारत स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.  

या चित्रपटातील एका भूमिकेसाठी अजय देवगणची निवड करण्यात आली होती. मात्र, आपण मल्टीस्टारर चित्रपट करणार नसल्याचे म्हणत त्याने नकार दिला होता.  

अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वप्रथम आमिर खानची निवड करण्यात आली होती. पण त्याने ती भूमिका करण्यास नकार दिला. त्यावेळी आमिर ‘इश्क’ या चित्रपटात व्यस्त होता.  

अक्षय खन्नाने या चित्रपटात धरमवीरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी अक्षय कुमारलाही विचारण्यात आले होते. मात्र त्यानेही यास नकार दिला होता. 

शाहरुख खाननेही ‘बॉर्डर’ चित्रपटाची ऑफर थेट नाकारली होती. त्यावेळी त्याला अशा प्रकारचा चित्रपट करायचा नव्हता.

शेवटी जेपी दत्ता अक्षय खन्नाच्या भूमिकेसाठी सलमान खानकडे गेले होते. पण त्यानेही देशभक्तीपर चित्रपट करण्यास नकार दिला आणि त्यानंतर ही भूमिका अक्षय खन्नाला मिळाली.  

या चित्रपटातील जॅकी श्रॉफच्या भूमिकेसाठी सुरुवातीला संजय दत्तची निवड करण्यात आली होती. मात्र त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. त्यावेळी संजय अनेक न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकला होता.  

या चित्रपटात सुनील शेट्टीची भूमिका सगळ्यांनाच आवडली. या भूमिकेसाठी सर्वप्रथम संजय कपूर याच्याशी बोलणे झाले होते. मात्र त्याने या भूमिकेसाठी नकार दिला होता.

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!