सायली-अर्जुनच्या आयुष्यात येणार ‘ही’ नवी व्यक्ती!

By Harshada Bhirvandekar
Apr 08, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. 

‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर आली आहे. 

या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. 

आश्रमाच्या केसबाबत अर्जुन आणि सायली पुरावे शोधण्यासाठी धडपड करत आहे.

आता या मालिकेत गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची लगबग पाहायला पाहायला मिळणार आहे.

गुढीची पूजा करताना अर्जुन कुटुंबीयांना काही वेळ वाट बघा कोणीतरी येतंय, असं म्हणताना दिसणार आहे.

अशातच गाडीतून उतरून एक नवीन पाहुणी सुभेदारांच्या घराच्या दिशेने चालत येते. 

ही पाहुणी दुसरी तिसरी कोणीही नसून ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव आहे. 

‘ठरलं तर मग’ या मालिकेत रुचिरा जाधवच्या रूपाने नव्या पात्राची एंट्री होताना पाहायला मिळणार आहे.

भेंडीची भाजी खावी की नाही? वाचा फायदे

Pexels