गदर
२००१ मध्ये निर्मित झालेल्या गदर या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. भारत पाक युद्ध तसेच हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलीची लव्हस्टोरीवर आधारित हा चित्रपट आहे.
रांझना
भारतात रांझना हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. मात्र, पाकिस्तानात मुस्लिम
मुलींसाठी बोल्ड म्हणून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
भाग मिल्खा भाग
चित्रपट भाग मिल्खा भाग हा धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात त्यांनी पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याचा एक संवाद असल्याने हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे.
पॅडमॅन
अक्षय कुमारचा चित्रपट पॅडमॅन हा पाकिस्तानच्या संस्कृती साठी योग्य नाही असे म्हणून हा चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
बेबी
बेबी चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून या चित्रपात मुस्लिमांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे म्हणत पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली आहे.
फॅनटम
सेफ अली खानचा चित्रपट असलेल्या फॅनटममध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिस सईडची खराब प्रतिमा दाखवल्याने पाकिस्तानात हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे.
मुल्क
दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांचा मुल्क या चित्रपटावर देखील पाकिस्तानात बंदी आहे. या चित्रपटाच्या कंटेंटमुळे हा बॅन करण्यात आला आहे.
रईस
शाहरुख खानचा रईस हा चित्रपट देखील पाकिस्तानात बॅन आहे. यात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने काम केले आहे. यात मुस्लिमांची प्रतिमा खराब दाखवल्याचा आरोप आहे.
निरजा
अभिनेत्री सोनम कपूर हिचा चित्रपट असलेला निरजा यात पाकिस्तानला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल बॅन करण्यात आला आहे.
राजी
आलिया भट हिचा राजी हा चित्रपट भारतात सुपरहिट झाला होता. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानमध्ये बॅन आहे. यात भारतीय मुलगी ही पाकिस्तानमध्ये जाऊन हेरगिरी करते असे दाखवण्यात आले आहे.