मंदिरात घंटा वाजवण्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. घरातील देव्हारा असो, वा मंदिर घंटा ही सगळीकडे वाजवली जाते.
घंटा वाजवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, असे मानले जाते. सकाळी देवाला निद्रेतून जाग देण्यापासून ते आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यापर्यंत घंटेचा सगळीकडे वापर होतो.
पण, मंदिरात किती वेळा घंटा वाजवावी हे तुम्हाला माहित आहे का? याबाबतीतील शास्त्रीय नियम काय आहे ते जाणून घेऊया...
प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार मंदिरातील घंटा वाजवतो. मात्र, हा घंटा वाजवण्याचा नियम स्थानिक रीतीरिवाजानुसार बदलू देखील शकतो.
काही मंदिरातील घंटा तासाभरात एकदा, दोनदा किंवा तीन वेळाच वाजवता येते.
मंदिरातील घंटा सतत वाजवता कामा नये. ती एक, दोन किंवा तीन वेळाच वाजवावी.
असेही मानले जाते की, देवासमोरील घंटा कधीही जोरात वाजवू नये.
जर, तुम्ही पूजा करण्यासाठी मंदिरात प्रवेश करत असाल तर जोराची घंटा वाजवल्याने तुमच्यातील भक्तीची भावना नष्ट होऊ शकते.
शास्त्र मान्यतेनुसार पूजा केल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना कधीही घंटा वाजवू नये, हे नियमांच्या विरुद्ध आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान