तमन्ना भाटिया बनली ‘राधाराणी’!  रूप पाहिलंत का?

By Harshada Bhirvandekar
Aug 23, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर नेहमीच प्रचंड सक्रिय आहे.

नुकतेच तमन्ना भाटिया हिने तिचे एक फोटोशूट सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये तमन्ना भाटिया ‘राधाराणी’ बनली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

तमन्नाने जंगलात भगवान श्रीकृष्णासोबत केलेले हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. 

तमन्ना भाटिया हिने तिचे हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

कृष्णाष्टमी जवळ येताच तमन्ना आधुनिक राधासारखी सजली आहे. 

जंगलात एका झाडाखाली कृष्णाची वाट पाहत असलेल्या राधाच्या या रुपात तमन्ना सुंदर दिसत आहे.

राजकुमारीसारख्या दिसणाऱ्या तमन्नाने या फोटोशूटसाठी लाइट ब्लू लेहंगा आणि पिंक ब्लाउज परिधान केला होता.

मॉडर्न राधासारखा दिसणारा तमन्नाचा हा लूक जबरदस्त असल्याची कमेंट चाहते करत आहेत.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!