बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तमन्ना भाटिया आपल्या सौंदर्यांना भल्याभल्यांना घायाळ करते.
तमन्ना प्रोफेशनल लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.
अभिनेत्रीचे लुक्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यामध्ये कधी ती वेस्टर्न, तर कधी ट्रेडिशनल रुपात दिसत असते.
आपली आगामी फिल्म 'सिकंदर का मुकद्दर' च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये तमन्नाने आपल्या किलर अदा दाखवल्या.
तमन्नाच्या बिकिनीवर कुण्डलिनी सापाचे डिझाइन बनवले आहे. यामध्ये ती नेहमीप्रमाणे सिझलिंग दिसत आहे.
अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला असून तिच्या ब्रा वरती एकीकडे साप दिसत आहे.
तमन्नाने बिकिनीवरती फुल स्लीव्स जॅकेट परिधान करत ग्लॅमरचा तडका लगावला आहे. जॅकेटचे कॉलर प्लीट्स करून असे डिझाइन बनवले आहे की, एका बाजुने ऑफ शोल्डर लुक मिळाला आहे.
अभिनेत्रीने धोती स्टाइल प्लीटेड स्कर्ट परिधान केली असून त्याला सेंटर थाई-हाई स्लिट कट दिला आहे.