‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून अभिनेत्री दिशा वकानी घराघरांत लोकप्रिय झाली.
दिशाने मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिच्या चित्रपटांची यादीही मोठी आहे.
दिशाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९७मध्ये ‘कमसीन: द अनटच’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले होते.
दिशा वकानीने ‘जोधा अकबर’, ‘मंगल पांडे’, ‘सी कंपनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत.
दिशाने केवळ हिंदीत नाही, तर गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. गुजराती चित्रपटसृष्टीत तिने स्वतःची छाप सोडली आहे.
‘जोधा अकबर’ या चित्रपटात दिशा वकानीने ऐश्वर्या रायसोबत स्क्रीन शेअर केली होती. यात तिने ऐश्वर्या रायच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
२००८मध्ये दिशाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत ‘दयाबेन’ची भूमिका मिळाली. या भूमिकेतून तिने उत्कृष्ट अभिनय केला.
या मालिकेत सुंदरलाल हा दयाबेनच्या भावाची भूमिका साकारत आहे. तो खऱ्या आयुष्यात ही दिशाचा भाऊ आहे.
२००७मध्ये दिशा वकानीने शोमधून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून ती पुन्हा मनोरंजन विश्वात झळकलेली नाही. आजही प्रेक्षक दिशा वकानीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.