टी-२० विश्वचषक जिंकणारे कर्णधार!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

एमएस धोनी २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने पहिल्या टी-२० विश्वचषकात ट्रॉफी जिंकली. भारताने पाकिस्तानविरुद्ध फायनल जिंकली.

२००९ च्या टी-20 विश्वचषकात युनूस खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

२०१० च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पॉल कॉलिंगवुडच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने त्यांची पहिली ट्रॉफी जिंकली.

टी-२० विश्वचषक दोनदा जिंकणारा डॅरेन सॅमी हा एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने २०१२ आणि २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने २०१४ टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता.

२०२१ टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा आरोन फिंच कर्णधार होता.

जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने २०२२ च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून पराभव करून त्यांचा दुसरा टी-२० विश्वचषक जिंकला.

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी