टी-२० विश्वचषकात रोहित शर्माचा विश्वविक्रम!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल सामना खेळला गेला.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी पोहोचला आहे.

याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्या नावावर होता. 

महेला जयवर्धने टी-२० विश्वचषकात एकूण १११ चौकार मारले. मात्र, हा विक्रम रोहित शर्माने मोडला.

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहितच्या चौकारांची संख्या ९१ होती, जी आता ११३ पोहचली आहे.

या यादीत विराट कोहली (१०५), डेव्हिड वॉर्नर (१०१), तिलकरत्ने दिलशान (१०१) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

चिया सीड्सचे फायदे