टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. फायबर आणि पोटॅशियम व्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.
टोमॅटोचे सेवन आपण अनेक प्रकारे करतो. काही लोक सॅलडपासून ते सूप बनवतात तर काहीजण त्यापासून सॉस आणि चटणी बनवतात.
आज आपण आंबट-गोड टोमॅटोची चटणीची रेसिपी पाहूया...
साहित्य-टोमॅटो - अर्धा किलो, साखर/गूळ, काळे मीठ, पांढरे मीठ, गरम मसाला,
लाल मिरची
सर्व प्रथम तुम्हाला टोमॅटो चांगले धुवावे लागतील. आता त्यांना मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगले बारीक करून घ्या.
गॅसवर कढई ठेवा, त्यात तेल टाका आणि गरम झाल्यावर त्यात, जिरे आणि थोडी हिंग घाला.
यानंतर टोमॅटोची पेस्ट घालून मिक्स करा.त्यात काळे मीठ, पांढरे मीठ, तिखट, गरम मसाला घालून परतावे. दाटसरपणा पाहून पाणी घाला आणि नंतर गूळ किंवा साखर घालून शिजवा.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री