अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं विधीवत लग्नगाठ बांधली आहे. या सोहळ्यातील काही फोटो तिनं चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
@ReallySwara
समाजवादी पक्षाचा युवा नेता फहाद अहमद याच्याशी स्वरानं फेब्रुवारी महिन्यात रजिस्टर लग्न केलं होतं. ट्वीट करून तिनं ही माहिती दिली होती. आता ती पारंपरिक पद्धतीनं लग्नबंधनात अडकलीय.
लग्नासाठी स्वरानं लाल रंगाची साडी परिधान केली होती, तर फहाद निळी जीन्स आणि सोनेरी जॅकेटमध्ये होता. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत होती.
लग्नाच्या निमित्तानं कर्नाटकी संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वरानं संगीताच्या तालावर ठेका धरला.