कधी कधी आपल्याला झोपल्यावर खूप वाईट स्वप्न पडतात आणि आपण घाबरून उठतो. असे स्वप्न पडू नये यासाठी स्वप्नशास्त्रात काही उपाय दिले आहे, हे उपाय करा.
मानसिक तणाव असेल तर शयनगृहात गाईच्या शुध्द तुपाचा दिवा लावावा व गुलाब अगरबत्ती लावून झोपणे.
अनेशा पोटी तुळशीची पाच पाने खाल्ल्यास त्रिदोषाचे निवारण होते.
लाल रंगाची रेशमी रिबीन प्रवेश द्वारावर बांधल्याने त्या वास्तूत सुख शांती लाभते.
आंबा,पिंपळ ,औदुंबर,पांढरी कण्हेर यांच्या पानांचे तोरण दरवाज्यावर लावणे मंगलकारक असते.
दारावर केव्हाही थाप मारू नये , त्या दिवशी घरात भांडण विवाद होतात.
दुकानात मन लागत नसल्यास गणपतीची पांढऱ्या रंगांची मूर्ती दुकानात स्थापन करावी. कामाचा विस्तार व आर्थिक वृद्धी होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)