स्वप्नात माकड दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या...

By Harshada Bhirvandekar
May 24, 2024

Hindustan Times
Marathi

स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे लक्षण असते. स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काहीना काही अर्थ असतो.  

स्वप्नात माकड दिसणे शुभ की अशुभ याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत...  

हिंदू धर्मात माकडाला भगवान हनुमानाचे रूप मानले जाते. त्यामुळे स्वप्नात माकड दिसणे ही एक खास गोष्ट आहे.

स्वप्नात माकड हसताना दिसले तर ते शुभ मानले जाते. म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे.

याचे देखील संकेत मिळतात की, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तसेच, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होणार आहेत.  

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात माकडांचा समूह दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.  

आर्थिक लाभाची ही प्रबळ शक्यता आहे. तुमचा पैसा कुठेही अडकला असेल, तर तो तुम्हाला परत मिळू शकतो.

स्वप्नात माकड काही खाताना दिसले, तर ते शुभ मानले जात नाही. याचा अर्थ तुमचे नुकसान होऊ शकते.

यासोबतच कुटुंबाला येणाऱ्या काळात काही संकटाला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय आर्थिक नुकसानही होऊ शकते.

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?