स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसणे म्हणजे पैसा मिळण्याचे संकेत!

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 12, 2024

Hindustan Times
Marathi

स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.

प्रत्येक स्वप्न भविष्यातील घटनांचे भाकीत करतात. स्वप्नात काही खास गोष्टी दिसणे किंवा पाहणे हे धन प्राप्तीचे संकेत असतात.

चला तर मग जाणून घेऊया की स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसल्याने धन धन प्राप्ती होते.

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात उंदीर दिसणे शुभ असते. स्वप्नात उंदीर पाहण्याचा अर्थ असा होतो, की अचानक आर्थिक लाभ होणार आहे. हे स्वप्न जीवनात समृद्धी दर्शवते.

स्वप्नात दूध देणारी गाय पाहणे शुभ असते. हे स्वप्न आनंद आणि समृद्धी दर्शवते.

आपल्या जीवनात डान्स पाहणे हा मनोरंजनाचा एक भाग मानला जातो. पण एखाद्या मुलीला स्वप्नात डान्स करताना पाहणे म्हणजे पैसे मिळण्याचे संकेत.

स्वप्नात देवाचे दर्शन होणे शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की दैवी कृपा होणार आहे. 

यासोबतच सुख-समृद्धीसोबतच आगामी काळात धनप्राप्ती होणार आहे.

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात मासे दिसणे शुभ असते. स्वप्नात मासे पाहिल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels