देवी-देवतांचे स्वप्न 'या' गोष्टीचे देतात संकेत

By Priyanka Chetan Mali
Feb 10, 2025

Hindustan Times
Marathi

स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत देवी-देवतांचे दर्शन होणे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे संकेत असते. देवी-देवतांचे स्वप्न पाहणे आपल्या भाग्याशी निगडीत आहे.

स्वप्नशास्त्रानुसार असे सांगितले जाते की, रात्री पाहिलेले देवी-देवतांचे स्वप्न काही खास गोष्टीचे संकेत देतात, यासंबंधी जाणून घेऊया.

स्वप्नात दुर्गा देवीने लाल साडीत दर्शन दिल्यास आणि सिंह शांत असल्यास, हे जीवनात एखादी शुभ घटना घडणार असल्याचे संकेत आहे.

जर दुर्गा मातेचे रौद्र रूप आणि देवी डरकाळी देणाऱ्या सिंहावर असल्यास, हे तुमच्याकडून एखादी मोठी चुक होणार असल्याचे संकेत आहे.

स्वप्नशास्त्रानुसार, झोपताना लक्ष्मी देवीचे स्वप्न पडल्यास अचानक धनलाभ आणि घरात सुख-समृद्धी येण्याचे संकेत देते.

मान्यतेनुसार रात्री सरस्वती देवी स्वप्नात दिसल्यास तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश आणि प्रगती मिळण्याचे संकेत देते.

असे सांगितले जाते की स्वप्नशास्त्रानुसार, हनुमानाचे स्वप्न पडणे शत्रूंवर विजय मिळवण्याचे संकेत आहे.

स्वप्नात महादेवाची पिंड दिसणे फार शुभ असते. असे सांगितले जाते की, यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि चांगला काळ सुरू होतो.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS