स्वप्नात या गोष्टी दिसल्यास लवकरच होईल लक्ष्मी प्रसन्न
By
Priyanka Chetan Mali
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात लक्ष्मी देवीला धनाची देवी मानले जाते. मान्यतेनुसार ज्या व्यक्तिवर देवी लक्ष्मीची कृपा राहते त्यांना धन-धान्याची कमतरता भासत नाही.
ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे. तसेच, लक्ष्मी देवी प्रसन्न होण्याआधी काही ना काही संकेत नक्की देते.
स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्न आहेत जे लक्ष्मी प्राप्तीचे संकेत देतात.
जर तुम्ही स्वप्नात बँकेत पैसे जमा करताय किंवा पैश्यांची बचत करताय तर हे शुभ संकेत आहेत. या स्वप्नाचा अर्थ आहे की, तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात पिवळे किंवा लाल फुल दिसले तर सुवर्णलाभाची शक्यता आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात पाऊस पडताना पाहिल्यास धनलाभाचे संकेत मिळतात.
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात दात स्वच्छ करत असाल तर हे शुभ संकेत आहेत. याचा अर्थ असा की, तुमच्यावर लक्ष्मी कृपा होणार आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात उंचावर चढणे शुभ असते. याचा अर्थ की, तुमची प्रगती होणार आहे.
स्वप्नात लाल साडी घालणे किंवा इतरांना लाल साडी घालताना पाहणे हे देखील लक्ष्मी प्राप्तीचे संकेत आहे.
जर तुम्ही स्वप्नात मंदिर पाहताय तर हे फार शुभ आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, भगवान कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि पैशांची भरभराट करतील.
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा