भाजपच्या दिवंगत नेत्या व माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी हिने सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

By Shrikant Ashok Londhe
Mar 28, 2023

Hindustan Times
Marathi

बांसुरी स्वराज यांची दिल्ली भाजपच्या लीगल सेलच्या सह-संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

बांसुरीने आपल्या नियुक्तीबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत.

बांसुरी स्वराज २००७ मध्ये बार काऊन्सिल ऑफ दिल्लीमध्ये सहभागी झाल्या. गेल्या १६ वर्षापासून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत असून क्रिमिनल लॉयर आहेत.

बांसुरी सुषमा स्वराज व स्वराज कौशल यांची एकलती एक मुलगी आहेत.

बांसुरी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात

बांसुरी यांनी वारविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतल्यानंतर लंडनमध्ये बीपीपी लॉ स्कूलमधून लॉ चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली

त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर ऑफ स्टडीज पूर्ण केले

बांसुरी स्वराज त्यावेळी प्रकाशझोतात आल्या होत्या जेव्हा त्या आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या टीममध्ये सामील झाल्या होत्या.

बांसुरी यांचे वडील स्वराज कौशलही क्रिमिनल लॉयर असून ते देशातील सर्वात कमी वयाचे एडव्होकेट जनरल राहिले आहेत.