सूर्यकुमार यादवला ‘स्काय’ नाव कोणी दिलं?

By Rohit Bibhishan Jetnavare
Sep 14, 2024

Hindustan Times
Marathi

टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आज (१४ सप्टेंबर) ३४वा वाढविदवस साजरा करत आहे.

सूर्याचा जन्म १४ सप्टेंबर १९९० रोजी मुंबईत झाला. मात्र, तो मूळचा गाझीपूर, उत्तर प्रदेशचा आहे.

स्कायने २०१० मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध ८९ चेंडूत ७३ धावांची खेळी केली होती.

मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त तो IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खेळला आहे.

मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले. त्या मोसमात सूर्याने शानदार फलंदाजी केली होती.

त्याने १६ सामन्यात ४८० धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला टीम इंडियात स्थान मिळाले.

सूर्याने १४ मार्च २०२१ रोजी अहमदाबादेत इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. डेब्यू सामन्यात त्याने ३१ चेंडूत ५७ धावा केल्या.

सूर्याने आतापर्यंत ७१ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये  २४३२ धावा केल्या.यात २० फिफ्टी आणि ४ शतकांचा समावेश आहे.

सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादवचे नाव स्काय असे ठेवले होते.

चिंब भिजलेले, रुप सजलेले! सई ताम्हणकरचा हॉट लूक