ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहणाला एक महत्वाची घटना मानली जाते. या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते.
पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहचत नाही, याच खगोलीय घटनेला सूर्य ग्रहण म्हटले जाते.
जाणून घेऊया वर्ष २०२५ मधले पहिले सूर्यग्रहण केव्हा आहे आणि भारतात हे ग्रहण दिसणार आहे की नाही.
वर्ष २०२५ चे पहिले सूर्य ग्रहण २९ मार्च २०२५ रोजी लागणार आहे. २९ मार्चला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हे ग्रहण सुरू होईल आणि ६ वाजून १६ मिनिटांनी संपेल.
सूर्य ग्रहण लागण्याच्या १२ तास आधीच सूतक काळ सुरू होऊन जातो. परंतू मार्च २०२५ मध्ये लागणारे हे पहिले सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही.
भारतात वर्षाचे हे पहिले सूर्य ग्रहण दिसणार नाही त्यामुळे याचा सूतक काळ वैध राहणार नाही.
धार्मिक मान्यतेनुसार, सूतक काळ सुरू झाल्यानंतर घराच्या बाहेर जाऊ नये आणि गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे.
सूर्य ग्रहण संपल्यानंतर त्याच्या परिणामांपासून बचावासाठी ग्रहण संपल्यानंतर स्नान केले पाहिजे आणि गरजूंना दान दिले पाहिजे.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री