बॉलीवूड इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सनी लिओनी एक पॉर्न स्टार होती. पण आता तिने पॉर्न इंडस्ट्री सोडून बरीच वर्षे झाली आहेत.
सनी लिओनी बॉलिवूडमध्ये दीर्घकाळापासून आहे. पॉर्न स्टार इंडस्ट्री सोडल्यावर सनीने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. तेव्हा देखील तिच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
पॉर्न इंडस्ट्री सोडून बरेच वर्ष उलटूनही सनीला ॲडल्ट फिल्म स्टारचा टॅग दिल्याने सनी नाराज झाली आहे. १३ वर्षांनंतर देखील तिला वेगळ्या नजरेनंन पाहिलं जात असल्यानं ती नाराज आहे.
सनी म्हणाली, जर तुम्ही याच नजरेनं पाहणार असाल तर पुढे कधी जाणार ? मात्र, आता वेळ आली आहे. माझे पूर्वीचे काम सोडले असून आता मी काय करतेय हे सर्वांनाच माहीत आहे.
सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. त्या आधी ती अमेरिकेत राहत होती. मात्र, सनीला भारतात लोकप्रियता मिळाली जेव्हा ती बिग बॉस शोमध्ये आली.
बिग बॉसनंतर सनीने जिस्म २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने जॅकपॉट, रागिनी एमएमएस २, एक पहली लीला, कुछ कुछ लोचा है, वन नाईट स्टँड यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले.
येत्या काही दिवसांत ती हेलन या चित्रपटात दिसणार आहे.