अशी बनवा चटपटीत ‘भरली कारली’!
By
Harshada Bhirvandekar
May 04, 2024
Hindustan Times
Marathi
कारल्याचा कडूपणा सहज दूर करता येतो. तुम्ही देखील ही चटपटीत भरली कारली नक्की ट्राय करा.
या डिशचे नाव आहे 'स्टफ्ड बिटर गार्ड'. बघूया त्याची अगदी सोपी रेसिपी.
कडूपणामुळे बरेच लोक सहसा कारली टाळतात. पण, जर त्यातील कडवटपणा काढून टाकला तर प्रत्येकजण ते खाऊ शकतो.
साहित्य: कारली-६, लसूण पेस्ट-२ चमचे, मिरची-३, जिरे- १ टीस्पून, शेंगदाणा- २५ ग्रॅम, मोहरी-१ टीस्पून
तेल- १ मोठा चमचा, २ कांदे, १ टोमॅटो, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट
कृती: कारली सोलून घ्या आणि त्यातील सगळ्या बिया काढून टाका.
कारल्यात मीठ टाकून थोडावेळ तसेच ठेवून द्या. यामुळे त्याचा कडवटपणा निघून जाईल.
लसूण, हिरवी मिरची, जिरे, शेंगदाणे, मोहरी, लाल तिखट आणि आमचूर पावडर मिक्स जारमध्ये घालून बारीक वाटून घ्या.
सारण तयार करण्यासाठी कढईत तेल घालून कांदा व टोमॅटो घाला. नंतर त्यात मसाले घालून चांगले परतून घ्या.
आता कारल्यात हा तयार मसाला भरून घ्या. दोन भाग एकत्र बांधा आणि तेलात तळून घ्या. तुमची 'भरली कारली' तयार!
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा