स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस रेसिपी!

By Aiman Jahangir Desai
Jan 10, 2025

Hindustan Times
Marathi

साहित्य- चिरलेली शिमला मिरची, किसलेले गाजर, हिरवे वाटाणे, बारीक चिरलेले बीन्स, चिरलेली ब्रोकोली, कांदे चिरलेले, 

आले, लसूण, हिरव्या मिरच्या,  व्हिनेगर, सोया सॉस, चवीनुसार मीठ,मिरपूड, उकडलेले तांदूळ, ऑलिव्ह ऑइल

प्रथम सर्व भाज्या चिरून  तयार करा आणि सर्व साहित्य जमा करा.

एका तव्यात ऑलिव्ह ऑइल गरम करा, त्यात आले आणि लसूण घाला आणि हलके परतून घ्या.

कांदा आणि मीठ घालून १० सेकंद परतून घ्या.आता गाजर आणि ब्रोकोली घाला आणि १-२ मिनिटे मोठ्या आचेवर परतून घ्या.

आता सर्व भाज्या घाला आणि २ मिनिटे परतून घ्या. नंतर काळी मिरी आणि व्हिनेगर घाला.

सोया सॉस घाला, उकडलेले तांदूळ घाला आणि चांगले मिसळा.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा