‘या’ सुंदर अभिनेत्रीने 'स्त्री २' मध्ये केली चेटकिणीची भूमिका

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 27, 2024

Hindustan Times
Marathi

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री २' चित्रपट  बॉक्स ऑफिसवर कमाल करताना दिसत आहे. 

हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण हे जाणून घेण्यास उत्सूक आहे की, अखेर चित्रपटात 'स्त्री'ची भूमिका कोणी केली आहे.

तर जाणून घेऊया श्रद्धा कपूरची हॉरर कॉमेडी फिल्ममध्ये 'स्त्री' चा रोल कोणत्या अभिनेत्रीने केला.

 'स्त्री २' मध्ये अभिनेत्री भूमी राजगौर हिने 'स्त्री'ची भूमिका पार पाडली. 

भूमी खऱ्या आयुष्यात खुपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. 

भूमी राजगौर बीचवर बसून पोज देत आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

भूमीने या चित्रपटात 'चित्ती'च्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. मात्र तिला 'स्त्री' चा रोल मिळाला.

भूमी राजगौर गुजराती चित्रपटात काम करते. 

भूमी अभिनयासोबतच चांगली नृत्यांगणाही आहे. ती खूपच चांगली कथ्थक डान्सर आहे.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!