स्टीव्ह स्मिथचं ५३५ दिवसांनंतर शतक
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 15, 2024
Hindustan Times
Marathi
ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथनेही ब्रिस्बेन कसोटीत शतक पूर्ण केले. स्मिथने १८५ चेंडूत शतक केले, त्याने १२ चौकार मारले.
स्मिथचे कसोटी कारकिर्दीतील हे ३३वे शतक आहे तर भारताविरुद्धचे १०वे शतक आहे.
जून २०२३ नंतर स्मिथला कसोटी सामन्यात शतक झळकावता आले नव्हते, पण आता त्याने दीड वर्षानंतर कसोटी शतक केले.
भारताविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीपूर्वी स्टीव्ह स्मिथचे शेवटचे शतक २०२३ च्या ॲशेस मालिकेदरम्यान झाले होते.
त्यावेळी जून २०२३ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने ११० धावांची इनिंग खेळली होती.
त्यानंतर शतक झळकावण्यासाठी त्याला ५३५ दिवस आणि २५ डावांची प्रतीक्षा करावी लागली.
स्मिथने गेल्या दीड वर्षात केवळ चार वेळा ५० धावांचा टप्पा गाठला होता.
भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर आला आहे.
स्मिथ जो रूटसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दोघांनी भारताविरुद्ध प्रत्येकी १० शतके केली आहेत.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा