मटारच्या वाटण्याचं चटपटीत लोणचं! लिहून घ्या रेसिपी
By
Harshada Bhirvandekar
Jan 28, 2025
Hindustan Times
Marathi
हिवाळा सुरू झाला की, बाजारात मटारचे वाटणे भरपूर प्रमाणात विक्रीसाठी येतात.
या काळात लोक मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण, तुम्ही कधी मटारचं लोणचं खाल्लंय का?
मटारचं लोणचं अतिशय चविष्ट आणि चटपटीत लागतं. नोट करा याची सोपी रेसिपी.
साहित्य : मटारचे वाटाणे, बडीशेप, ओवा, हळद, लाल तिखट, लोणच्याचा मसाला, तेल, मीठ, आमचूर पावडर
मटारच्या शेंगा सोलून, स्वच्छ धुवून घ्या. वाटाण्यातील पाणी पूर्णपणे निघून जाऊ द्या आणि ते कोरडे करून घ्या.
आता कढईत तेल गरम करून त्यात बडीशेप, आणि ओवा घालून परतून घ्या.
आता यात मटारचे वाटाणे घाला. वरून हळद, लाल तिखट, आमचूर, लोणच्याचा मसाला घालून मिक्स करा.
सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या की, वरून चवीनुसार मीठ घाला आणि थोडावेळ झाकण घालून हलके शिजवून घ्या.
मटार मऊसूत होईपर्यंत शिजवा. यासाठी केवळ ५ मिनिट लागतील. मिश्रण करपू देऊ नका.
मटार शिजले की गॅस बंद करा. तयार आहे तुमचं चटपटीत मटार लोणचं!
लिंबाचे सरबत
नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे
PEXELS
पुढील स्टोरी क्लिक करा