झणझणीत लसणाच्या चटणीची रेसिपी!
By
Aiman Jahangir Desai
Dec 26, 2024
Hindustan Times
Marathi
लसूण हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. म्हणूनच लोक बहुतेकदा त्यांच्या जेवणात याचा समावेश करतात.
तुम्ही लसणाचे लोणचे आणि परांठा खाल्ला असेल. पण आज आम्ही तुम्हाला लसणाची चटणी कशी बनवायची ते शिकवणार आहोत, तेही ट्विस्टसह.
साहित्य- लसूण पाकळ्या(सोललेल्या), 1-2 टोमॅटो, 2 चमचे लाल तिखट, 1 टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ
मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या, टोमॅटो, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ टाका.
आता सर्वकाही बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा.
या चटणीला जिरे, होरी आणि कडिपत्त्याचा तडका द्या.
तुमची टोमॅटो लसूण चटणी तयार आहे.
ही चटणी पकोडे, पराठे आणि डाळ भातासोबत खा.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा