होळीनंतर येतोय खास योग; ‘या’ राशींना होणार लाभ!

By Harshada Bhirvandekar
Mar 23, 2024

Hindustan Times
Marathi

यंदा होळीचा सण २४ मार्चला साजरा केला जात आहे. या नंतर एका विशेष योग तयार होत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार दर अडीच महिन्यांनी चंद्राचे संक्रमण होते.

अशावेळी चंद्र जेव्हा कोणत्याही राशीत इतर ग्रहांशी संयोग करतो, तेव्हा इतर राशींवर देखील चंद्राचा प्रभाव पडतो.

यावेळी २७ मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार असून, त्याचा गुरु आणि बुधाशी संयोग साधत आहे. त्यामुळे दुहेरी गजकेसरी योग तयार होत आहे.

ज्योतिषांच्या मते, दुहेरी गजकेसरी योगामुळे काही राशींना भरपूर फायदा होणार आहे. चला तर बघूया कोणत्या आहेत ‘या’ राशी...

होळीनंतर येणाऱ्या दुहेरी गजकेसरी योगामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील.

दुहेरी गजकेसरी योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर लाभ होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

मकर राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेसरी अतिशय शुभ आणि लाभदायी असणार आहे. नोकरीत फायदा होईल.

नऊवारी साडी नव्हे; गौतमी पाटीलचा बीच लूक व्हायरल!

All Photos: Instagram