दाक्षिणात्य अभिनेत्रीने सांगितला साऊथ आणि बॉलीवुड इंडस्ट्रीतील फरक

By Shrikant Ashok Londhe
Feb 12, 2025

Hindustan Times
Marathi

रेजिना कॅसेंड्रा एक प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री असून विशेष करून तामिळ आणि तेलुगु चित्रपटात काम करते. ती लवकरच सनी देओलसोबत जाट चित्रपटात झळकणार आहे. 

अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपल्या बॉलीवूडमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर करत साऊथ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील फरक सांगितला.

रेजिना कॅसेंड्राने सांगितले की, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये भाषेची अडचण येत नाही कारण येथे डबिंगला प्रेफर केले जाते. 

मात्र हिंदीत असे होत नाही. नॉर्थ इंडस्ट्रीत भाषेबाबत कोणतीही सवलत दिली जात नाही. जर तुम्हाला भाषा येत नसेल तर काम मिळत नाही.

साऊथ इंडस्ट्रीत असे होत नाही. जरी तुम्हाला त्यांची भाषा येत नसेल तरी तुम्ही साऊथ चित्रपटात काम करू शकता. 

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील चित्रपट ग्रामीण भागावर फोक्सड असतात तर बॉलीवूड चित्रपट अर्बन अपील असतात. 

मला बॉलीवूडमध्ये काम करताना नेटवर्किंग इवेंट्स अटेंड करण्यास सांगितले होते, साउथ फिल्ममध्ये ही कॉन्सेप्ट नाही. 

साऊथमध्ये कास्टिंग एजेंटही खूप कमी असतात व नेटवर्किंग पीआरओ किंवा मॅनेजर्स हँडल करतात. 

हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत खूप कॉम्पिटीशन आणि सेल्स प्रमोशन होते, मी अशी व्यक्ती नाही की, जी कामासाठी स्वत:ला विकेन आणि त्यासाठी लॉबिंग करेन.

मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, या वास्तू टिप्स कामी येतील