सोनाक्षीच्या गळ्यातील चोकरची किंमत ऐकून बसेल शॉक!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली आहे. 

अभिनेत्रीने एका खाजगी समारंभात नोंदणीकृत लग्न करून, एक भव्य रिसेप्शन पार्टी दिली. 

इतर अभिनेत्रींप्रमाणे सोनाक्षीने डेस्टिनेशन वेडिंग किंवा आउटफिट्सवर पाण्यासारखा पैसा खर्च केला नाही. 

पण रिसेप्शनच्या निमित्ताने अभिनेत्रीने परिधान केलेल्या दागिन्यांची किंमत निश्चितच आश्चर्यकारक आहे.

रिसेप्शनच्या दिवशी सोनाक्षीने लाल सिल्कची साडी, केसात सिंदूर, हातात बांगड्या आणि गळ्यात हिरव्या मोत्यांचा चोकर परिधान केला होता. 

सोनाक्षीने घातलेला हा चोकर करण जोहरच्या ‘Tyani Jewellery’ या ज्वेलरी ब्रँडचा आहे. 

या चोकर, कानातले आणि बांगड्यांसाठी सोनाक्षी सिन्हाला लाखो रुपये खर्च करावे लागले. 

करण जोहरच्या ब्रँड Tyaniच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे की, सोनाक्षीने नेकलेस आणि कानातल्याच्या सेटसाठी ४,६५,००० रुपये दिले आहेत. 

तर, तिच्या हातातील बांगड्या दोन लाखांच्या वर आहेत. सोनाक्षीने ज्वेलरी ब्रँडला ७ लाखांपेक्षा जास्त रुपये दिले आहेत.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान