सोमवती अमावस्येला करा या मंत्राचा जप, सर्व अडचणी होणार दूर

By Priyanka Chetan Mali
Dec 25, 2024

Hindustan Times
Marathi

मार्गशीर्ष महिन्यात सोमवती अमावस्या सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे. ही या वर्षाची शेवटची अमावस्या आहे.

हिंदू धर्मात अमावस्येला खास महत्व आहे. या दिवशी लक्ष्मी माता, भगवान विष्णू, महादेव आणि पार्वती माता यांची पूजा केली जाते.

सोमवती अमावस्येला काही खास मंत्रांचा जप केल्याने देवी-देवतांची विशेष कृपा होईल.

पहिला मंत्र - ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।

अमावस्येला या गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो. आर्थिक नुकसानातून दिलासा मिळतो.

ॐ नमः शिवाय - मान्यतेनुसार भगवान शंकराच्या या पंचाक्षरी मंक्षाचा जप केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.

'ॐ कुल देवताभ्यो नमः' अमावस्या तिथीचे स्वामीदेव पितृदेव आहेत. सोमवती अमावस्येच्या दिवशी तर्पण किंवा पिंडदान करताना या मंत्राचा जप करावा.

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥ 

सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान करताना या मंत्राचा जप केल्याने तीर्थक्षेत्री स्नान केल्यासमान पुण्य लाभतं.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ मध्ये काय- काय मिळणार?

HT Tech