२०१७नंतर पहिल्यांदाच ८ एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे.
Unsplash
ही सर्वात महत्त्वाच्या खगोलीय घटनांपैकी एक आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
Unsplash
संपूर्ण सूर्यग्रहण सूर्याचा अभ्यास करण्याची एक अनोखी संधी देणार आहे, जे सूर्याच्या उष्णतेमुळे इतर दिवशी दिसत नाही.
Unsplash
हे सूर्यग्रहण दक्षिण पॅसिफिक महासागरावरून सुरू होईल आणि मेक्सिकोचा पॅसिफिक किनाऱ्यावरून पहिला दिसेल. त्यानंतर ते मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामधून उत्तर अमेरिकेत दिसेल.
Unsplash
नासाच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण सूर्यग्रहणाचा मार्ग सुमारे १६,००० किलोमीटर लांब आणि १८५ किलोमीटर रुंद असेल.
Unsplash
रिपोर्ट्स नुसार, ८ एप्रिलचे पूर्ण सूर्यग्रहण ४ मिनिटे आणि २८ सेकंद टिकणे अपेक्षित आहे. मात्र, हे स्थानावर अवलंबून आहे.
Unsplash
सूर्यग्रहण थेट पाहू नये असे म्हणतात. मात्र, पूर्ण सूर्यग्रहण वेगळे आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, ग्रहणाचा हा एकमेव असा प्रकार आहे, ज्यात ग्रहणाचे चष्मे तात्पुरते बाजूला ठेवले जाऊ शकतात.