नवरी नटली! शोभिता धूलिपालाचा प्री-वेडिंग लूक बघाच!
By
Harshada Bhirvandekar
Oct 22, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि स्टार नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
दोघांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत, त्याची एक सुंदर झलक अभिनेत्रीने दाखवली.
शोभिताने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘पसुपू दंचदम’ समारंभातील छायाचित्रे शेअर केली आहेत.
तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गोधुमा राय पसुपु दंचदम आणि अशाप्रकारे सुरुवात झाली'.
या प्रसंगी, अभिनेत्री गोल्डन ब्लाउजसह कोरल सिल्कची साडी परिधान करताना दिसली.
तिला ही साडी होणाऱ्या सासूने म्हणजेच नागा चैतन्य याच्या आईने दिल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेत्री तिचे लांब केस वेणी स्टाईलमध्ये बांधत, त्यावर गजरे सजवले होते.
यासोबतच सोन्याचे दागिने आणि हिरव्या बांगड्या घालून तिचा हा प्री-वेडिंग इव्हेंटचा लूक पूर्ण झाला.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती कॅमेऱ्यासाठी सुंदर फोटो पोझ देताना दिसत आहे.
All Photos: Instagram
हार्मोनल असंतुलन सुधारणारे ‘हे’ पदार्थ माहितीयत?
पुढील स्टोरी क्लिक करा