स्मृती मानधनानं किती शतकं ठोकली?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jan 16, 2025
Hindustan Times
Marathi
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा वनडे राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यात भारताच्या स्मृती मानधना हिने शतक झळकावले.
महिला एकदिवसीय सामन्यात १० शतके करणारी मानधना पहिली भारतीय खेळाडू ठरली.
मानधनाने ८० चेंडूत ७ षटकार आणि १२ चौकारांसह १३५ धावा केल्या. तिने ८० चेंडूत शतक पूर्ण केले.
मानधनाने गेल्या १० वनडे डावात ६९५ धावा ठोकल्या आहेत. यात २ शतकांचा समावेश आहे.
आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेतील तीन सामन्यात तिने ४१, ७३ आणि १३५ धावांची खेळी केली.
याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही ती अशाच फॉर्मात होती. तीन टी-20 सामन्यात तिने ३ अर्धशतकं ठोकली होती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत तिने १०५ धावांची खेळी केली होती.
माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी
पुढील स्टोरी क्लिक करा